.

तमालपत्रा च्या फक्त पन्नास रोपट्यांपासून करा लाखो रुपयांपर्यंतची कमाई Bay leaf farming - Business idea in Marathi

 

tamalpatra

तमालपत्र हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे असेलच. तमालपत्राशिवाय बिर्याणी किंवा पुलाव यांची कल्पना न केलेलीच बरी. मसाल्याच्या पदार्थांमधील प्रमुख घटक असलेले हे तमालपत्र आपल्याला लाखो रुपयांचे उत्पन्न सुद्धा मिळवून देते. तमालपत्राला जगभरातून खूपच मोठी मागणी आहे. चला तर पाहूया तमालपत्रापासून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे मिळवता येते ते.


तमालपत्र म्हणजे काय?  त्याचा वापर कुठे केला जातो? (What is bay leaf? Where is it used?)

तमालपत्र  हे एक वाळवलेले सुगंधित पान आहे ज्याचा वापर मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो.  यामुळे पदार्थांना एक विशिष्ट प्रकारची चव आणि सुगंध प्राप्त होतो. खूप पूर्वीपासून तमालपत्र हा चांगले उत्पन्न मिळवून देणारा स्त्रोत आहे.  पूर्वी काही मोजक्या देशांमध्येच तमालपत्रा ची शेती केली जात होती पण आता यापासून मिळणारे उत्पन्न पाहता बऱ्याच देशांमध्ये याची शेती केली जाते.

तमाल पत्रा ची शेती करणारे काही प्रमुख देश (Countries that cultivate bay leaf)


तमाल पत्रा चे उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये हे प्रामुख्याने  भारत  पाकिस्तान, रशिया, अमेरिका तसेच युरोप खंडातील काही देश  जसे की इटली,  फ्रान्स आणि  बेल्जियम यांचा समावेश होतो.

तमालपत्र ची शेती कशी केली जाते? (How to do the bay leaf farming?)

जर आपल्याकडे कमीत कमी पाच गुंठे जागा असेल तर आपण पण तमालपत्र ची लागवड आरामात करू शकता.  सुरुवातीला रोपे वाढविण्यासाठी आणि जगविण्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात. जसजशी रोपे मोठी होऊ लागतात तसे त्यांच्या देखभालीसाठी वेळ देखील कमी लागतो.


 तमाल पत्रा पासून किती उत्पन्न मिळते? (How much we can earn from bay leaf farming?)

तमालपत्रा च्या एका रोपा पासून एका वर्षात तीन ते पाच हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते म्हणजेच जर आपण ५० रोपे लावली तर आपण वर्षाअखेरीस २.५ लाख रुपयांचे उत्पन्न अगदी आरामात मिळवू शकता. 

जमीन आणि मातीपरीक्षण (How to cultivate bay leaf?)

तमालपत्राच्या शेती करिता माती परीक्षण करणे खूप गरजेचे आहे. तमालपत्राच्या वाढीसाठी कार्बनिक पदार्थांनी युक्त अशा शुष्क मातीची गरज असते त्याचबरोबर मातीची पीएच लेवल  ही सहा ते आठ यांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. 

तमाल पत्रा ची शेती करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचे परीक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तमालपत्र उत्पादनासाठी जमीन तयार  करताना  त्यामध्ये जैविक खताचा वापर जरूर करावा. 

तमालपत्रा साठी जमीन तयार करणे हे खूपच महत्त्वाचे आहे. रोपट्याची  लागवड करण्यापूर्वी जमीन सुकू द्यावी. त्यानंतर पुर्ण जमिनीमध्ये जैविक खत टाकावे आणि त्यानंतर तमालपत्रा च्या रोपट्याची लागवड करावी.

तमालपत्रा च्या रोपट्यावर पडणारे रोग (Bay leaf plant diseases)

 तमालपत्रा वर साधारणतः तीन प्रकारची कीड आढळून येते.  यामध्ये (Aphids),  हार्ड शैलेड स्केल (Hard shelled scale), माईट्स (Mites) यांचा समावेश होतो. 

तमालपत्राच्या रोपट्याचे  या किडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा अर्क फवारला जातो.  यामध्ये रासायनिक  कीटकनाशकांचा सुद्धा वापर केला जातो.  ज्या ठिकाणी तमालपत्राची रोपे लावलेली आहेत त्या ठिकाणची जमीन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. 

जर कडुलिंबाच्या वापराने सुद्धा तमालपत्रा वरील कीड कमी झाली नाही नाही तरच रासायनिक खतांचा वापर करावा.

तमाल पत्राच्या रोपट्याच्या योग्य वाढीसाठी त्याची वेळच्यावेळी छाटणी करणे गरजेचे असते  त्यामुळे रोपट्याची वाढ योग्य पद्धतीने होऊन त्यापासून जास्त उत्पन्न मिळवता येते.

भारतात तमालपत्र चे उत्पादन कोठे कोठे घेतले जाते? (Leading Bay leaf farming states)


 उत्तर भारतामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये  तर दक्षिण भारतामध्ये केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये तमालपत्र चे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. योग्य माती परीक्षण आणि योग्य खतांचा वापर करून तमालपत्र चे उत्पादन कोठेही घेतले जाऊ शकते.(Tejpatta cultivation)सरकारी सबसिडी/अनुदान (Government subsidy for bay leaf farming)

तमालपत्रा ची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना NMPB तर्फे (National Medicinal Plants Board) तीस टक्के अनुदान दिले जाते.टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने