.

LED बल्ब बनवण्याच्या व्यवसायातून करा लाखो रुपयांची कमाई LED bulb making business - Business idea in Marathi

 

LED bulb


कोणताही व्यवसाय चालू करताना मागणी आणि पुरवठा यांचा विचार करावा लागतो. जर मागणी जास्त आणि त्या तुलनेत पुरवठा कमी असेल तो व्यवसाय हमखास चालतो. 


आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे LED बल्ब बनवण्याचा. 


LED  बल्ब चे फायदे काय काय आहेत? (Benefits of LED Bulb)


LED  बल्ब चे बरेच फायदे आहेत त्यामुळे त्याची मागणी खूपच जास्त आहे. 

  • याचा प्रकाश इतर बल्ब च्या तुलनेत जास्त आहे. 
  • या बल्ब मुळे  विजेची खूपच बचत होते म्हणूनच पारंपरिक बल्ब ची मागणी कमी होऊन LED बल्ब ची मागणी खूपच वाढलेली आहे. 
  • हा बल्ब टिकाऊ असून खूप जास्त टिकतो. 
  • LED  बल्ब हा प्लास्टिक मटेरियल पासून बनवला जातो त्यामुळे तो फुटण्याचा धोका नसतो. 
  • LED बल्ब हा रिसायकल केला जातो. 
  • या मध्ये पाऱ्यासारखे घटक पदार्थ नसतात. 


LED बल्ब चे जीवनमान किती असते? (Life of LED Bulb)


इलेक्ट्रॉनिक्स च्या भाषेत सांगायचे झाले तर LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. जेंव्हा इलेक्ट्रॉन सेमीकंडक्टर पदार्थांमधून जातात तेंव्हा ते छोट्या छोट्या कनांना प्रकाशित करतात आणि यालाच LED म्हटले जाते. अन्य उपकरणांप्रमाणेच LED बल्ब ची सुद्धा एक लाईफ असते आणि ती असते ५०००० तास. म्हणजेच LED बल्ब ५०००० तासापर्यंत चालतात.  LED  बल्ब च्या तुलनेत सामान्य CFL बल्ब ची लाईफ फक्त ८००० तास असते. 


LED  बल्ब चा व्यवसाय कसा सुरु करता येईल? (How to start LED Bulb business?)

हा व्यवसाय अगदी कमी भांडवलामध्ये सुद्धा सुरु करता येतो. या मध्ये भांडवल कमी पण नफा जास्त मिळत असल्यामुळे हा  एक चांगला व्यवसाय मानला जातो. 


LED बल्ब च्या व्यवसायाची ट्रेनिंग कोठे मिळेल? (Training to make LED Bulbs)


छोट्या आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारकडून ट्रेनिंग उपक्रम राबवले जातात. स्वयंरोजगार देणाऱ्या बऱ्याच संस्था सुद्धा असे ट्रेनिंग देतात. हा बल्ब बनवणाऱ्या कंपन्यांकडून सुद्धा असे ट्रेनिंग घेतले जाऊ शकते.  


या ट्रेनिंग मध्ये आपल्याला LED चे बेसिक ज्ञान, PCB चे बेसिक ज्ञान तसेच या व्यवसायासाठी लागणारी सामग्री आणि सरकारी योजनांबद्दल माहिती दिली जाते  . 


या व्यवसायासाठी किती भांडवल लागते? (Investmetn for LED bulb making business)


कमीत कमी ५०००० रुपये  भांडवलापासून हा व्यवसाय सुरु करता येतो. या साठी वेगळ्या दुकानाची किंवा जागेची गरज नसते. हा व्यवसाय आपण घरातून सुद्धा सुरु करू शकता. 


LED बल्ब च्या व्यवसायातून किती उत्पन्न मिळते? (Income from LED bulb business)


एक LED बल्ब बनवण्यास कमीत कमी ५० रुपयांपर्यंत खर्च येतो आणि हा बल्ब मार्केट मध्ये १०० रुपयांना विकला जातो म्हणजेच आपला फायदा दुप्पट होतो.

एका दिवसात आपण १०० ते १५० बल्ब आरामात बनवू शकता म्हणजेच  दिवसाकाठी आपण ५००० ते ७५०० रुपयांपर्यंत कमाई करू शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने