.

कुल्हड उत्पादनाचा व्यवसाय आजच सुरु करा आणि मिळवा भरघोस उत्पन्न Kulhad making business - Business idea in Marathi

 

Kulhad Imageभारतामध्ये चहा पिणाऱ्यांची संख्या कमी नाही त्यामुळे आपल्याला जागोजागी चहाची दुकाने पाहायला मिळतात मग ते रेल्वे स्टेशन असो वा बस स्टॉप किंवा शहरातील कॉर्नर या सर्व ठिकाणी आपल्याला फुल्ल गर्दी पहायला मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चहा विक्रेते सुद्धा नवीन नवीन प्रयोग करताना दिसतात. आजच्या युज अँड थ्रो च्या जमान्यात एक नवीन प्रकार पाहायला मिळतो आणि तो म्हणजे कुल्हड (Kullad chai). पूर्वी फक्त उत्तर भारतामध्ये अस्तिस्त्वात असलेला हा प्रकार आता सगळीकडे वेगाने वाढतोय. या मध्ये चहा पिण्याची मजाच काही और आहे. 


कुल्हड म्हणजे काय? (What is kulhad?)


कुल्हड म्हणजे एक मातीचे भांडे जे चहा, ताक, लस्सी इत्यादी पिण्यासाठी वापरले जाते(Kulhad chai). कुल्हड हे यूज अँड थ्रो असल्यामुळे विक्रेत्यांना सुद्धा ते परवडते तसेच या कुल्हडमुळे दहा रुपयांचा चहा वीस ते पंचवीस रुपयांना आरामात विकला जातो. या मध्ये चहा पिल्यास चहाला एक प्रकारे भाजलेल्या मातीची चव येते जी बऱ्याच जणांना आवडते. काचेच्या आणि स्टीलच्या ग्लास मध्ये चहा पिऊन कंटाळलेल्या लोकांना मातीच्या भांड्यात चहा प्यायला खूपच गम्मत वाटते त्यामुळे याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरी भागामध्ये तर या कुल्हड ला प्रचंड मागणी आहे (Kulhad tea). चहा साठी छोट्या आकाराचे कुल्हड वापरले जाते तर लस्सीसाठी मोठ्या आकाराचे कुल्हड वापरले जाते. (Kullad tea).


कुल्हड बनवण्याचा व्यवसाय कसा केला जातो? (Kulhad making business)


आपण सर्वानी कुंभाराचे चाक आणि त्यावर मडके बनवण्याची प्रक्रिया पाहिली असेलच. कुल्हड हा तोच प्रकार आहे फक्त त्याची जाडी मडक्यापेक्षा  कमी असते. (Kulhad cups) सध्याच्या आधुनिक युगात कुंभाराच्या पारंपरिक चाकाऐवजी स्वयंचलित इलेक्ट्रिक चाकाचा वापर केला जातो. हे चाक आकाराने लहान असल्यामुळे छोट्या जागेत सुद्धा आपण हा व्यवसाय करू शकता. या साठी थोड्याशा प्रशिक्षणाची आवश्यकता असते जे सरकारी संस्थांकडून मोफत दिले जाते.  


या व्यवसायासाठी सरकार कश्या प्रकारे मदत करते? (Government help in Kulhad making business)

भारतामध्ये प्लास्टिक आणि थर्माकॉल च्या कपांवर बंदी आल्यामुळे कुल्हड ची मागणी प्रचंड वाढली आहे. केंद्रीय मंत्रालयाने सुद्धा प्लास्टिक आणि थर्माकॉल चे प्रदूषण कमी करण्यासाठी कुल्हड च्या वापरला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. कुल्हड हे मातीपासून बनविले जाते त्यामुळे ते पर्यावरण पूरक देखील आहे.  

या व्यवसायासाठी सरकारकडून इलेक्ट्रिक चाकांचे वाटप केले जाते. या आधुनिक चाकावर कुल्हड आणि सर्व प्रकारची  मातीचे भांडी बनवली जाऊ शकतात. 

तयार माल सरकारकडून चांगल्या किमतीत खरेदी सुद्धा केला जातो. आपण बाजारात सुद्धा आपला माल विकून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळावू शकता. 


कुल्हड बनवण्याच्या व्यवसायासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? (Requirements for kulhad making business)


आपण हा व्यवसाय कमीत कमी ५ हजार रुपयांपासून सुरु करू शकता. या साठी कमीत कमी ५०० स्क्वेअर फूट जागेची गरज भासते. कच्चा माल, साठवणूक, भट्टी प्रक्रिया या गोष्टींची माहिती आपल्याला ट्रेनिंग मध्ये दिली जाते. थोड्याश्या सरावानंतर आपण कुल्हड बनवण्यामध्ये प्राविण्य मिळवू शकता. सध्या या व्यवसायामध्ये जास्त स्पर्धा नाही त्यामुळे तयार माल विकण्यासाठी आपणास जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. आपण सरकारी किंवा खासगी व्यापाऱ्यांना आपला माल विकू शकता. लग्न समारंभांमध्ये या कुल्हड ला खूपच जास्त मागणी असते. (Kulhad tea cup)कुल्हड विक्रीतून आपल्याला किती पैसे मिळू शकतात? (Benifits from kulhad making business)


चहा, दूध लस्सी इत्यादीसाठी वेग वेगळ्या आकाराचे कुल्हड (Kulhar) बनवले जातात. चहाच्या कुल्हड साठी आपल्याला ५० ते ७० रुपये प्रति शेकडा एवढी किंमत मिळू शकते.(Kulhad price) लस्सीच्या कुल्हड साठी १५० ते २०० रुपये प्रति शेकडा तर दुधाच्या कुल्हडसाठी आकारानुसार १०० ते २०० रुपये प्रति शेकडा इतका भाव मिळू शकतो.

आपल्या उत्पादन क्षमतेनुसार आपण दिवसाला २ ते ५ हजार रुपयांपर्यंत आरामात कमाऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने