.

अशी एक भन्नाट बिझनेस आयडिया जी आपल्याला अल्पावधीतच बनवते करोडपती online petrol diesel selling business - Business idea in Marathi

 

online petrol diesel selling businessजर आपल्याकडे भन्नाट बिझनेस आयडिया असतील तर मार्केट मधून करोडो रुपये कमावण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. आज आपण एक अशी बिझनेस आयडिया पाहणार आहोत ज्याबद्दल आपण कधी साधी कल्पना सुद्धा केली नसेल. (How to start my own business?)

ऑनलाईन शॉपिंग बद्दल आपल्या सर्वाना माहीतच आहे पण जर पेट्रोल आणि डिझेल सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करता आले तर? हा विचार सत्यात उतरवला आहे  pepfuels .com चे निर्माते टीकेंद्र आणि संदीप यांनी.  

पेट्रोलपंपावर दिसणाऱ्या लांबच लांब रांगा आणि त्यामुळे होणार वेळेचा अपव्यय हि समस्या टीकेंद्र यांनी अचूक हेरली आणि या व्यवसायाची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी या विचारावर आणखी संशोधन करण्याचे ठरवले आणि घरोघरी भेट देऊन लोकांचा फीडबॅक घेतला. 

ऑनलाईन फीडबॅक च्या माध्यमातून सुद्धा लोकांचे मत नोंदवले गेले आणि जवळपास ७०% पेक्षा जास्त लोकांनी या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यातूनच जन्म झाला एका नव्या कंपनीचा. हि कंपनी आपल्या ऑर्डर नुसार आपल्याला पेट्रोल आणि डिझेल चा घरपोच पुरवठा करते. 

या व्यवसायामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL ) आणि पेसको (pesco) या सारख्या ऑइल कंपन्या आपल्याला मदत करतात. हा बिझनेस सुरु करण्यासाठी आपल्याला सरकारी मान्यता मिळवावी लागते. या बिझनेस मध्ये आपल्याला ऑइल कंपन्यांबरोबर थर्ड पार्टी अग्रीमेंट करावे लागते. ग्राहक वेबसाइट किंवा मोबाइल अँप वरून ऑनलाईन ऑर्डर करतात आणि ऑर्डर नुसार आपलयाला पेट्रोल आणि डिझेल चा पुरवठा करावा लागतो. (Online petrol and diesel delivery)

pepfuels.com चे उदाहरण द्यायचे झाले तर टीकेंद्र, प्रतीक आणि संदीप यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. (startup pepfuels.com) या प्रोजेक्टला सरकार मान्यता देखील आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या व्यवसायाने pepfuels.com चा टर्नओव्हर १०० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. 

भारतात २०१६ पर्यंत पेट्रोल आणि डिझेल घरपोच विक्रीला मान्यता न्हवती पण त्यानंतर सरकारने या व्यवसायाला मान्यता दिली. हा प्रस्ताव PMO कार्यालयात पाठवला गेला. ऑइल कंपंन्यांबरोबर सुद्धा बोलणी केली गेली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या सहयोगाने हा व्यवसाय उभा राहिला जो आज कोट्यवधी रुपये कमावून देत आहे. 

जर आपल्याला सुद्धा असा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण भारत सरकार आणि ऑइल कंपन्यांची परवानगी मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण प्रोजेक्टचा आराखडा बनवावा लागतो.

 मान्यता मिळाल्यानंतर आपण इंधन विक्रीसाठी वेबसाइट आणि अँप  बनवून घेऊ शकता. 
इंधन वाहतुकीसाठी आपणास वाहनांचा बंदोबस्त करावा लागतो. 

या व्यवसायासाठी सध्या स्पर्धा अजिबात नसल्यामुळे हा व्यवसाय आपल्याला भरघोस कमाई  करून देऊ शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने