.

घरच्या घरी पापड बनवण्याचा व्यवसाय करून मिळवा लाखोंचे उत्पन्न Papad production at home - Business idea Marathi

 

papad making businessपापड म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर येतो एक चविष्ट आणि रुचकर  पदार्थ जो बरेच जण जेवताना आवर्जून खातात ज्या मुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच पण जेवणाचा आनंद सुद्धा द्विगुणित होतो. हॉटेल मध्ये तर मसाला पापड ची ऑर्डर दिल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. असा हा पापड संपूर्ण भारतात आणि परदेशात सुद्धा आवडीने खाल्ला जातो. वाढत्या लोकसंखेप्रमाणे पापडाची  मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी हे पापड घरोघरी बनवले जात होते पण आता बदललेल्या जीवनशैली मुळे लोकांना पापड बनवण्यासाठी वेळ मिळत नाही त्या मुळे तयार पापडाची मागणी प्रचंड वाढलेली आहे. या बिझनेस साठी आपल्याला वेगळ्या जागेची गरज नाही. हा बिझनेस आपण घरातून सुद्धा सुरु करू शकता. चला तर पाहूया कसा केला जातो हा पापड बनवण्याचा बिझनेस.  


पापड तयार करण्याच्या उद्योगासाठी किती खर्च येतो? (Investment to make papad)


भारत सरकारच्या राष्ट्रीय लघुउद्योग मंडळाच्या प्रोजेक्ट अंतर्गत भारतातील लघु आणि गृह उद्योगांसाठी स्वस्तात कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत आपल्याला ४ लाखांपर्यंतचे कर्ज अत्यंत माफक व्याज दारात मिळते. या व्यवसायासाठी कमीत कमी ६ लाख रुपयांची आवश्यकता भासू शकते. उर्वरित २ लाख रुपयांचा बंदोबस्त आपल्याला स्वतः करावा लागतो. 


या व्यवसायासाठी कोण कोणत्या गोष्टींची गरज आहे? (Things required in papad making business)


पापड तयार करण्याच्या  व्यवसायासाठी कमीत कमी ३०० ते ५०० स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असते. या युनिट मध्ये पापड बनवण्याच्या दोन मशीन, पॅकिंग मशीन इतर युटिलिटी इत्यादींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त वीज पाणी यांसारख्या बेसिक गोष्टींचा वेगळा खर्च येतो. मशीन चालविण्यासाठी २ प्रशिक्षित ऑपरेटर आणि ३ मदतनीसांची गरज भासते. जस जसा व्यवसाय वाढत जातो तस तसे मनुष्यबळ सुद्धा वाढवावे लागते. 


पापड बनवण्याच्या व्यवसायात किती पैसे मिळतात? (Earning from papad making business)


जर आपण ६ लाख रुपये गुंतवले असतील तर या व्यवसायातून आपल्याला ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत कमाई होते. व्यवसाय वाढला तर हि कमाई कितीतरी पटींनी वाढते. 


तयार माल कोठे विकावा? (Where to sell papad)


आपण तयार माल घाऊक बाजारात विकू शकता. त्याच बरोबर छोट्या छोट्या दुकानांमध्ये आपण भेट देऊन तेथे सुद्धा आपला माल विकू शकता. आपण मार्केटिंग स्टाफ ची सुद्धा नियुक्ती करू शकता. या मध्ये सुरुवातीला ग्राहक तयार करणे हे महत्वाचे काम आहे. या व्यवसायात स्पर्धा आहे पण मागणी सुद्धा प्रचंड असल्यामुळे आपण आरामात आपला माल विकू शकता. 


कर्ज कोठे मिळेल? (Where to get a loan for papad making business)


कोणत्याही बँकेत प्रधानमंत्री राष्ट्रीय मुद्रा लोण योजने अंतर्गत या व्यवसाठी कर्ज मिळते. कर्ज फेडण्याचा कालावधी ५ वर्षेपर्यंत असतो. 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने