.

कच्चे पोहे बनवण्याचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवा Raw Poha manufacturing business - Business idea in Marathi

 

raw poha manufacturing

सकाळच्या नाश्त्याला जर पोहे नसतील तर त्या नाश्त्याला अर्थ तो काय! पोहे आवडत नाहीत असा माणूस सापडणे विरळाच. भारतामध्ये पोह्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मग तो सकाळचा नाश्ता असो वा मुलगी बघण्याचा कार्यक्रम, पोह्यांशिवाय तो अपूर्णच! 


पोहे बनवण्याच्या बिझनेस मध्ये किती खर्च येतो? (Raw poha manufacturing business)


आजच्या बिझनेस आयडिया मध्ये आपण पाहणार आहोत कच्चे पोहे बनवण्याचा बिझनेस ज्यामुळे आपण कमी भांडवलामध्ये लाखो रुपयांची कमाई करू शकता. 

पोहे हे एक पोषक अन्न सुद्धा मानले जाते त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चला तर पाहूया पोहे बनवणाऱ्या युनिट बद्दल. 


पोहे बनवणाऱ्या युनिट साठी साधारणतः २.५ लाख रुपये खर्च येतो. या मध्ये ९०% पर्यंत आपल्याला कर्ज मिळते त्यामुळे आपल्याला फक्त १०% रकमेचा म्हणजेच २५००० रुपयांचा बंदोबस्त करावा लागतो. 


या बिझनेस साठी कोण कोणत्या गोष्टींची गरज असते? (Poha making business)


पोहे बनवणाऱ्या युनिट साठी आपल्याला फक्त ५०० स्क्वेअर फूट जागेची अवशक्यता असते. त्याचबरोबबर पोहे बनवण्याची मशीन, एक भट्टी, पॅकिंग मशीन, ड्रम, साठवणुकीचे सामान आणि कच्चा माल या गोष्टींची गरज भासते. सुरुवातील आपण हा व्यवसाय थोड्या प्रमाणात चालू करून नंतर तो वाढवत न्यावा. 


तयार माल कोठे विकावा? (Raw Poha marketing)


पोह्यांना सध्या बरीच मागणी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या भागातील रेस्टोरंट, नाश्ता सेंटर किंवा किराणा मालाची दुकाने येथे माल विकू शकता. सुरूवातीला बाजारभावापेक्षा थोड्या कमी किमतीत माल विकून मार्केट मध्ये जम बसवू शकता आणि त्या नंतर किंमत वाढवू शकता. आपल्या भागातील दुकानांना भेट देण्यासाठी काही मार्केटिंग वाल्या लोकांची नियुक्ती सुद्धा केली जाऊ  शकते. आपण इंटरनेट वर सुद्धा आपल्या मालाची जाहिरात करू शकता आणि ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ग्रोसरी ऑनलाईन स्टोअर मध्ये सुद्धा आपला माल विकू शकता. 

हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या बिझनेस पैकी हा एक बिझनेस आहे. 


या व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवाल? (Loan for poha manufacturing unit)


कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. त्यानंतर आपण सरकारी ग्रामोद्योग योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज देऊ शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा याची माहिती ग्रामोद्योग कार्यालयात मिळू शकते त्याशिवाय काही एजन्ट सुद्धा हे काम करून देतात. अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत म्हणजे आपला अर्ज लवकरात लवकर स्वीकृत होईल. 


सरकार ग्रामोद्योगाना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. हा सुद्धा त्याच योजनेचा एक भाग आहे ज्या मध्ये आपल्याला ९०% पर्यंत कर्ज मिळते. 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने