.

परदेशी बी रहित काकड्यांचे उत्पादन करून भरघोस उत्पन्न मिळवा Cucumber farming business - Business idea in Marathi

 

Cucumber farming


पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमधून भरघोस उत्पन्न घेता येते हि गोष्ट आता सर्वज्ञात आहेत त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच वापर करून आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बरेच शेतकरी नवीन वाणाचा (बियाण्यांचा) वापर करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. 


आजच्या बिझनेस आयडिया मध्ये आपण बी रहित (सीडलेस) काकड्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती घेणार आहोत. देश आणि विदेशातून असणाऱ्या प्रचंड मागणीमुळे या काकड्या अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाल्या आहेत. देशी काकड्यांच्या तुलनेत या काकड्यांचा दर सुद्धा दुप्पट आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. (cucumber agriculture)


या परदेशी काकड्यांबद्दल माहिती कोठे मिळेल? (Neatherland cucumber farming)


या लेखामध्ये ज्या काकड्यांचा उल्लेख केला आहे त्या काकड्यांचे वाण नेदरलँड मध्ये विकसित करण्यात आले आहे. याचे बियाणे नेदरलँड मधून आयात करावे लागते किंवा काही मध्यस्थ संस्थांमार्फत सुद्धा या बियाण्यांची खरेदी केली जाऊ शकते. या काकड्यांचा उत्पादन काळ सुद्धा देशी काकड्यांच्या तुलनेत कमी आहे म्हणजेच फक्त ३ महिन्यात या काकड्या विक्रीसाठी तयार होतात. 


तसेच या काकड्यांचे उत्पादन बाराही महिने घेतले जाऊ शकते. या परदेशी काकड्या सर्व प्रकारच्या मातीमध्ये तग  धरू शकतात. ज्या मातीची पीएच लेव्हल ६ ते ७ च्या दरम्यान आहे अशी माती या काकड्यांसाठी जास्त अनुकूल असते  त्यामुळे लागवडीपूर्वी मातीपरीक्षण जरूर करावे. हा व्यवसाय खुल्या शेती मध्ये (cucumber farming in open field) किंवा पॉलीहाऊस (cucumber farming in polyhouse) मध्ये सुद्धा करता येऊ शकतो. 


या व्यवसायामध्ये किती गुंतवणूक करावी लागते आणि किती नफा मिळतो? (Investment in cucumber farming business)


या व्यवसायामध्ये मुख्य खर्च आहे तो बियाण्यांचा त्याच बरोबर खते आणि कीटकनाशके यावर देखील खर्च करावा लागतो. जर आपण एक लाख रुपये बियाण्यांमध्ये आणि एक लाख रुपये खते आणि कीटकनाशकांवर खर्च केले तर साधारणतः ३ ते ४ महिन्यात आपण ८ लाख रुपयांचे उत्पन्न काढू शकता. जमिनीचा पोत, वातावरण, लागवड क्षमता या नुसार उत्पन्नामध्ये थोडाफार फरक पडू शकतो. या व्यवसायामध्ये सरकारी सबसिडी सुद्धा मिळते. 


परदेशी काकडयांना काय बाजारभाव मिळतो? (Profit from cucumber farming business)


देशी काकड्यांच्या तुलनेत या काकड्या चवीला चांगल्या असतात. या मध्ये बी नसते (Seedless cucumber) आणि गराचे प्रमाण जास्त असते. तसेच या बाराही महिने उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे या काकड्याना ४० ते ५० रुपये प्रतीकिलो असा भाव मिळतो जो देशी काकड्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने