.

टिफिन पुरवण्याच्या पारंपरिक व्यवसायातून करा लाखो रुपयांची कमाई Tiffin service business - Business idea in Marathi

 

Tiffin services business

आजकाल नोकरी किंवा व्यवसायामुळे बऱ्याच जणांना घरापासून दूर राहावे लागते त्यामुळे बरेच जण जेवणाचे डबे पुरवणाऱ्यांच्या शोधात असतात. शिक्षणानिमित्त बाहेरगावि राहणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा जेवणाच्या डब्याची गरज भासते. 

जेवणासाठी हॉटेल चा पर्याय नेहमीच उपलब्ध असतो पण बरेच जण हॉटेल पेक्षा घरगुती जेवणाला जास्त पसंती देतात. घरगुती जेवण हे हॉटेल च्या तुलनेत जास्त पोषक असते आणि त्यास खर्चही कमी लागतो त्यामुळे  डबेवाल्यांच्या व्यवसाय खूपच तेजीत आहे. 

या व्यवसायात नफा सुद्धा  चांगला होत असल्यामुळे बरेच जण या व्यवसायाकडे वळलेले आहेत. आपल्या पदार्थांची गुणवत्ता जर चांगली असेल तर या व्यवसायात आपण खूप जास्त पैसे कमाऊ शकता. 

टिफिन व्यवसायासाठी किती भांडवलाची गरज भासते? (Investment in tiffin business)


अगदी ८ ते १० हजार रुपयांपासून हा व्यवसाय सुरु करता येतो. हा व्यवसाय आपण घरातून सुद्धा सुरु करू शकता. त्यासाठी वेगळ्या जागेची गरज नसते. पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला चांगल्या कुक ची गरज भासते त्याशिवाय डबे पोहोचवण्यासाठी सुद्धा एक किंवा अधिक लोकांची गरज भासते. 

जर आपण व्यवसायाची नुकतीच सुरुवात केली असेल तर हि कामे आपण स्वतः सुद्धा करू शकता आणि व्यवसाय वाढल्यावर पगारी मदतनीस ठेऊ शकता. 

टिफिन किंवा डबे पुरवण्याच्या व्यवसायातून आपण किती कमाई करू शकता? (Profit potential in tiffin business)


या व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन खूपच जास्त  म्हणजे ५०% पर्यंत आहे. जर आपण मात्र १० हजार रुपयांपासून या व्यवसायाची सुरुवात केली तर अल्पावधीतच आपण ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकता. हा व्यवसाय हळू हळू वाढत जाणारा व्यवसाय आहे त्यामुळे सुरुवातील जर नफा होत नसेल तर निराश न होता व्यवसाय चालू ठेवावा आणि नवीन ग्राहक जोडण्यावर लक्ष केंद्रित करावे. सहा महिन्यांमध्ये आपणास परिणाम दिसू लागतील आणि आपला नफा सुद्धा वाढत जाईल. 

या व्यवसायासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता. जर आपण क्वांटिटी आणि क्वालिटी याचा योग्य समतोल राखला तर आपल्या ग्राहकांची संख्या झपाटयाने वाढेल आणि आपला नफा सुद्धा!

डबे पुरवण्याच्या व्यवसायासाठी लागणारे इतर साहित्य (Requirement for tiffin service business)


जर आपण घरातून हा व्यवसाय सुरु करणार असाल तर या व्यवसायासाठी लागणाऱ्या  साहित्यांपैकी बरेच साहित्य आपल्याकडे अगोदरच उपलब्ध असेल. या मध्ये अन्न शिजवण्याची भांडी, गॅस, ताटे,  वाट्या, चमचे तसेच डबे यांचा समावेश होतो. बऱ्याच वेळा वेळेवर डबे पोहोचवण्यासाठी आपणास ऑफिस मध्ये जाण्याची गरज भासते त्यासाठी एक गाडी असणे गरजेचे आहे. 

जर आपण स्वतः अन्न शिजवणार नसाल तर आपणास एका कुक (स्वयंपाक्या) ची नियुक्ती करावी लागेल आणि एक मदतनीस सुद्धा ठेवावा लागेल. 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने